वाजपेयींच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
देशाचे माजी राष्ट्रपती स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जंयतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी दिल्लीतील सदैव अटल स्मारक येथे जाऊन अटल बिहारी वाजपेयींना अभिवादन केले.
याचसोबतच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील अभिवादन केले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंहसह अनेक नेत्यांनी अटल स्मारक येथे जाऊन वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त लखनऊ येथे त्यांच्या नावाने बनणाऱ्या मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन करणार आहेत.
याआधी केंद्रीय कॅबिनेट बैठकीत रोहतांग खिंडीतील बोगद्याला वाजपेयी यांचे नाव देण्यास मंजूरी देण्यात आली होती. अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान पदाचा 5 वर्षांचा कार्यकाळ पुर्णकरणारे पहिले गैर-काँग्रेसी नेते होते. 2015 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.