10 हजार कोटी राज्यासाठी पुरेसे नाहीत – उद्धव ठाकरे

frame 10 हजार कोटी राज्यासाठी पुरेसे नाहीत – उद्धव ठाकरे

Thote Shubham

औरंगाबाद : परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारकडून देण्यात येणारे 10 हजार कोटी राज्यासाठी पुरेसे नाहीत. केंद्राकडून राज्यासाठी भरघोस मदत घेण्यात येईल. तुम्ही खचून जाऊ नका. मी तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलो असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना सांगितले.

कानडगाव, गारज यासह कन्नड, वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी आज संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदेंसह अनिल देसाई, चंद्रकांत खैरे व शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहेत. तुम्हा सर्वांचे चांगले केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कोणीच आत्महत्येचे पाऊल उचलू नका. आमचे सरकार स्थापन झाले की, सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे.                                                                                                                                                                                                                            

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More