कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच कुत्र्याचा मृत्यू ?
हाँगकाँगमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन कुत्र्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्हायरसमुळे एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. हा 17 वर्षीय पोमरिनियन कुत्रा एका 60 वर्षीय महिलेचा आहे.
दोन दिवसांपुर्वी कुत्र्याची तपासणी केल्यानंतर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र नंतर त्याला हॉस्पिटलमधून सुट्टी दिल्यावर घरी आणताच त्याचा मृत्यू झाला.
प्राण्यांचे डॉक्टर असलेले फॉनिशियल हब यांच्यानुसार, कुत्र्याच्या मृत्यूचे कारण क्वारंटाईनमधील तणाव, भिती आणि कुटुंबापासून लांब राहणे हे आहे. कुत्र्याच्या मालकीनीने त्याचे पोस्टपार्टम करण्यास नकार दिला.
प्रशासनाचे म्हणणे आहे की, कुत्र्यात कोणतेही लक्षण दिसलेले नाहीत. मात्र एका डॉक्टरचे म्हणणे आहे की, त्याच्या नाक व तोंडाच्या नमुन्यांमध्ये कोरोना व्हायरसशी मिळतेजुळते लक्षण दिसले आहेत. विभागने म्हटले आहे की, खरचं व्हायरसची लागण झाली होती की नाही याचा तपास केला जाईल. या प्रकरणावर जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, अद्याप पाळीव प्राण्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आलेले नाही.