मुंबई पोलिसांसाठी अक्षय कुमारने दिले 1000 सेन्सर बॅण्ड

Thote Shubham

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी पहिल्या फळीत उभे असलेले आपले कोरोना वॉरिअर्स म्हणजेच पोलीस बांधव यांच्या मदतीसाठी बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार पुन्हा एकदा पुढे आला आहे. मुंबई पोलिसांना अक्षय कुमार यावेळी एक बहुमूल्य भेटवस्तू दिली आहे.

 

त्याने दिलेल्या या भेटवस्तूमुळे मुंबई पोलिसांची मोठी मदत होणार आहे. मुंबई पोलिसांना अक्षयने 1000 सेन्सर बॅण्ड भेट दिले असून मुंबई पोलीस मनगटावर बांधायचे हे सेन्सर बॅण्ड वापरणारा पहिला विभाग ठरणार आहे.

 

मुंबई पोलीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवर अहोरात्र पहारा देत आहेत. त्यात ते आपल्या स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र खपत आहेत. यादरम्यान कोरोनाची शेकडो पोलिसांनाही लागण झाली आहे तर, या जीवघेण्या रोगामुळे काही पोलीस बांधव शहिद देखील झाले आहेत. अशा काळात मुंबई पोलिसांची सुरक्षा लक्षात घेत, अक्षय कुमारने त्यांच्यासाठी हे खास मनगटी हेल्थ बॅण्ड दिले आहेत.


अक्षय कुमार कोरोनाच्या या संकटसमयी सातत्याने मदत करत आहे. त्याने सुरुवातीला पंतप्रधान सहायता निधीत 25 कोटींची मदत दिल्यानंतर डॉक्टर व आरोग्य कर्मचा-यांच्या पीपीई आणि रॅपिड टेस्ट किट खरेदीसाठी मुंबई महानगरपालिकेला तीन कोटी रुपयांची रक्कम दान केली.

 

त्याचबरोबर मुंबई पोलिसांनाही त्याने 2 कोटींची आर्थिक मदत केली आहे. त्याचबरोबर या कोरोना वॉरिअर्सच्या कार्याच्या सन्मानार्थ त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी देखील बदलत याठिकाणी त्याने महाराष्ट्र पोलिसांचा लोगो लावला आहे.

 

Find Out More:

Related Articles: