आमची लढाई काँग्रेस-राष्ट्रवादीशी नाही तर वंचित बहुजन आघाडीशी - मुख्यमंत्री

Thote Shubham

नांदेड : आमची लढाई ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी नाही. आमची लढत वंचितसोबतच आहे. वंचित बहुजन आघाडीचा येत्या काळात विरोधीपक्ष नेता होईल, असे भाकीत मुख्यमंत्र्यांनी केले आहे. वंचितला भाजपाची 'बी टीम' म्हणणारे काँग्रेस राष्ट्रवादीच आता 'बी टीम' होत आहे. त्याची काळजी त्यांच्या नेत्यांनी करावी, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

नांदेडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागील पाच वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांची माहिती दिली. त्यावेळी विरोधकांचा टोला लगावला. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. शरद पवार हे मोठे नेते असून त्यांच्याबाबत मी काही वक्तव्य करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

अलिकडच्या दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीतले अनेकजण शरद पवार यांची साथ सोडून भाजपमध्ये येत आहेत. तेव्हा पवारांनी काळाची पावले ओळखली पाहिजेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, घरांचा प्रश्न लवकरच संपले. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने तीन लाख घरांना मंजुरी दिली आहे. यामध्ये जवळपास सव्वा लाख घरे महाराष्ट्रासाठी आहेत, असे ते म्हणालेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युतीबाबत प्रश्न विचारला असता, विधानसभा निवडणुकीत आमची युती आहे आणि शंभर टक्के युती राहणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.                                                              


Find Out More:

Related Articles: