मनोरंजन करण्यासाठी रियाचं आयुष्य पणाला लावू नका - अभिनेत्री ट्विंकल खन्ना

frame मनोरंजन करण्यासाठी रियाचं आयुष्य पणाला लावू नका - अभिनेत्री ट्विंकल खन्ना

Thote Shubham
अभिनेत्री ट्विंकल खन्नाने रिया चक्रवर्तीला पाठिंबा देत तिच्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलंय. मनोरंजन करण्यासाठी रियाचं आयुष्य पणाला लावू नका, असं ट्विंकल म्हणाली आहे.

हे प्रकरण मला आता जादुच्या खेळासारखं वाटतंय, असं ट्विंकलने म्हटलंय. एक लेख लिहून ट्विंकल खन्नाने सुशांत मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या प्रमाणे जादुगार आपला खेळ दाखवण्यापूर्वी लोकांचं मनोरंजन करतो त्याचप्रमाणे रियाचं मीडिया ट्रायल सुरु आहे, असं ट्विंकल खन्नाने म्हटलं आहे.

मला प्रश्न पडतोय माध्यमांमधील हे जादुगार कॅमेरा बंद झाल्यावर स्वत:ला काय विचारत असतील? लाखो लोकांचं मनोरंजन करण्यासाठी तुम्ही एका व्यक्तीचं आयुष्य पणाला लावत आहात, अशा आशयाचा ब्लॉग लिहून ट्विंकलने रियाला पाठिंबा दिलाय.


Find Out More:

Related Articles:

Unable to Load More