वादाच्या भोवऱ्यात अक्षयचा 'हाऊसफुल ४'
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत 'हाऊसफुल ४'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परंतु प्रदर्शना पूर्वीच हा विनोदी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यामुळे अक्षयच्या मार्गावरील अडचणी वाढताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये वापरण्यात आलेल्या संगीतामुळे या चित्रपटा भोवती वादाचं वादळ फिरत आहे.
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही लोकांनी ट्रेलरमध्ये वापरण्यात आलेले संगीत चोरीचा असल्याचा आरोप करण्यात आला होता. ट्रेलरमधीव पार्श्व संगीत हे स्कोर चिरंजीवी स्टारर 'कैदी १५०' चित्रपटातील संगीता प्रमाणे असल्याचे वाटत होते. रिपोर्टनुसार हे संगीत संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांचे आहे.
संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांचे संगीत ट्रेलरमध्ये वापरून देखील त्याना त्यांच्या कामाचे श्रेय देण्यात आलेले नाही. परंतु निर्मात्यांनी आतापर्यंत यासंबंधतीत कोणतही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
‘हाऊसफुल’ या फ्रँचाइजीमधला ‘हाऊसफुल ४’ हा चौथा चित्रपट आहे. अक्षय शिवाय चित्रपटात रितेश देशमुख, क्रिती सनॉन, बॉबी देओल, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा अशी कलाकारांची एकत्र मेजवाणी चाहत्यांना अनुभवता येणार आहे.