उद्धव ठाकरे कौतुकास पात्र - जावेद अख्तर
तसेच सर्वच स्तरातून डॉक्टर, पोलिसांप्रमाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं कौतुक होत आहे. तसेच आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही उद्धव ठाकरे कौतुकास पात्र असल्याचं सांगत त्यांना सलाम केला आहे.
ट्विटरच्या माध्यमातून जावेद अख्तर यांनी ठाकरेंचं कौतूक केलं आहे. याबाबत बोलताना ते म्हणतात, ‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने करोना व्हायरसंबंधी स्पष्ट निर्देश देत परिस्थिती हाताळत आहे ते कौतुकास पात्र आहे. माझा सलाम’…
जोपर्यंत करोनाचं संकट आहे तोपर्यंत सर्व मशिदी बंद करण्यात याव्यात असा दारूल देवबंदनं फतवा काढण्याची मागणी एक स्कॉलर आणि अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहीर महमूद यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीचं मी समर्थन करतो,’ असं देखील ट्विट त्यांनी केलं आहे.