यांना मिळाला भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

frame यांना मिळाला भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

Thote Shubham

यंदाच्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जेम्स पीबल्स, मिशेल मेयर आणि दिदियर क्वेलॉझ यांना जाहीर करण्यात आला आहे. जेम्स पीबल्स यांना महाविस्फोटापासून आत्तापर्यंत विश्वाची उत्क्रांत होत गेलेली अवस्था आणि विश्वातील पृथ्वीचं स्थान या विषयावरील सैद्धांतिक संशोधनासाठी तर मिशेल मेयर आणि दिदियर क्वेलॉझ यांना बाह्यग्रहाच्या शोधासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नोबेलच्या निवड समितीने तिघांचाही गौरव करताना विश्वाचा वेध घेणारे हे क्रांतिकारी संशोधन असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वैद्यकशास्त्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. मेडिसिन क्षेत्रात जगातील सर्वोच्च समजला जाणारा हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला आहे.

फिजिओलॉजी या वैध्यशास्त्रातील शोधासाठी विल्यम जी केलिन ज्युनियर, सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल सेमेन्जा या तिघांना संयुक्तपणे नोबेल पुरस्काराने देऊन गौरविण्यात येणार आहे. नोबेल पुरस्कार विजेत्याला पदक, प्रशस्ती पत्र आणि ४.५ कोटी रुपये रोख देण्यात येणार आहेत. या तीन शास्त्रज्ञांनी कोशिकाएंच्या ऑक्सिजन ग्रहणावर करण्यात आलेल्या शोधासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More