
भारतातील टोयोटाच्या या कार होणार दिसेनाशा
1 एप्रिलपासून बीएस6 इंजिन असलेल्या गाड्यांचीच विक्री कंपन्यांना करता येणार आहे. मात्र काही कंपन्या अपग्रेडेशनसाठी अधिक खर्च येत असल्याने आपल्या वाहनांना अपग्रेड करत नाही. म्हणजेच या गाड्या एक एप्रिलपासून कंपनीच्या शोरूममध्ये दिसणार नाहीत. यात टोयोटाच्या देखील काही कार आहेत, ज्या 1 एप्रिलपासून बाजारात दिसणार नाहीत.

इटियोस –
टोयोटा इंडिया भारतात आपली एंट्री लेव्हल सेडान कार इटियोसला बीएस6 इंजिनमध्ये अपग्रेड करणार नसल्याचे सांगितले जात आहे. इटियोस रेंज तीन इंजिन पर्यायामध्ये येते. यातील इटियोस सेडान आणि इटियोस क्रॉसमध्ये क्रमशः 1.4 लीटर डिझेल आणि 1.5 लीटर पेट्रोल इंजिन मिळते. डिझेल इंजिन 68 पीएस पॉवर आणि 170 एनएम टॉर्क देते तर पेट्रोल इंजिन 90 पीएस पॉवर आणि 132 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसोबत येते. तसेच, इटियोस लिव्हा आणि इटियोस क्रॉसमध्ये 1.4 लीटर डिझेल इंजनशिवाय 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 80 पीएस पॉवर आणि 104 एनएम टॉर्क देते.
कंपनीने इटियोस सेडानला 2010 मध्ये बाजारात आणले होते. त्यानंतर 2011 मध्ये इटियोस लिव्हा आणि 2014 मध्ये इटियोस क्रॉसला लाँच केले होते. मात्र ग्राहकांना ही कार विशेष आवडली नाही.

टोयोटा ग्लेंजा –
कंपनीने मागील वर्षी मारुती सुझुकीच्या बलेनोचे रीबॅज व्हर्जन ग्लेंजाला लाँच केले होते. जी कंपनीची एंट्री लेव्हल सेडान कार होती. त्यानंतर कंपनीच्या प्रोडक्ट लाइनअपमध्ये सेडान कार यारिसचा नंबर येतो. मात्र, टोयोटाने या कार बंद करणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.

कोरोला एलटिस –
इटियोस व्यतिरिक्त टोयोटा कोरोला एलटिसला देखील बंद करण्याच्या तयारीत आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात नवीन जनरेशन कोरोलाची विक्री सुरू आहे. कंपनी लवकरच या कारला भारतात लाँच करणार आहे. टायोटा ग्लेंजानंतर व्हिटारा ब्रेजा, सियाज आणि अर्टिगाचे रीबॅज व्हर्जन बाजारात आणू शकते.