कोरोना : जवळील टेस्टिंग सेंटर शोधण्यात मार्गदर्शक बनणार गुगल

Thote Shubham

कोरोना व्हायरसबाबत लोकांमध्ये जागृकता पसरविण्यासाटी टेक्नोलॉजी कंपनी गुगल देखील प्रयत्न करत आहे. यासाठी गुगल आपल्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे फीचर लाँच करत आहे. आता गुगल युजर्सला जवळील कोव्हिड-19 टेस्टिंग सेंटर्सची माहिती देणार आहे.

 

द व्हर्जच्या रिपोर्टनुसार, गुगलवर कोव्हिड-19 विषयी काहीही सर्च केल्यास युजर्सला तेथे जवळील कोरोना व्हायरस टेस्टिंग सेंटर्सची माहिती मिळेल. हे फीचर सध्या अमेरिकेत लाँच करण्यात आले असून, अमेरिकेतील 43 राज्यांमध्ये जवळपास 2000 सेंटर्सची माहिती देत आहे. लवकरच भारत आणि इतर देशांमध्ये देखील हे फीचर लाँच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गुगल आणि अ‍ॅपल या टेक्नोलॉजी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या मिळून कोरोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्लॅटफॉर्म देखील तयार करत आहेत. याशिवाय गुगल भारतात मॅप्सवर जवळील फूड आणि नाईट शेलर्ट्सची माहिती देखील युजर्सला उपलब्ध करून देत आहे.

Find Out More:

Related Articles: