
सुपर कॉम्प्युटरद्वारे झाली कोरोनाचे संक्रमण रोखणाऱ्या रसायनांची ओळख
कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत असल्याने वैज्ञानिकांना वेगाने यावरील लस शोधण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. यासाठी वैज्ञानिकांनी जगातील सर्वात वेगवान कॉम्प्युटर समिटची मदत घेतली आहे. कॉम्प्युटरने 77 औषधांच्या कंपाउंडची (रसायन) ओळख केली आहे. हे रसायन कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी सक्षम आहेत.
अमेरिकेच्या उर्जा विभागने वर्ष 2014 मध्ये समिट कॉम्प्युटरवर काम करण्यास सुरूवात केली होती. हा कॉम्प्युटर सर्वात वेगवान लॅपटॉपपेक्षा 10 लाख पट अधिक शक्तीशाली आहे. संशोधक समिटद्वारे 77 रसायनांची ओळख केली होती, त्याद्वारे सर्वात चांगल्या मॉडेलचे निर्माण करेल.