भारतीय वैज्ञानिकांनी तयार केले स्वदेशी डेंटल इम्प्लांट

Thote Shubham

दातांची समस्या असल्यावर महागडे परदेशी दात इम्पालंट करावे लागतात. मात्र आता स्वेदशी कृत्रिम दात (डेंटल इम्पालंट) बसवणे शक्य होणार आहे. आयआयटी दिल्ली आणि मौलाना आझाद इंस्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेजच्या वैज्ञानिकांनी एक दशकाच्या मेहनतीने स्वदेशी डेंटल इम्प्लांट तयार केले आहे.

 

आतापर्यंत भारतात चीन, युरोप, अमेरिका, इस्त्रायल आणि कोरियावरून हे इम्प्लांट येत असे. स्वदेशी इम्प्लांट हे तीन पट स्वस्त आहे. भारतीय डेंटल इम्प्लांटची किंमत साडेसात हजार रुपये आहे. तर त्याच गुणवत्तेचे स्वीडनचे इम्प्लांट 20 हजार रुपयांचे आहेत. देशात दरवर्षी 5-6 लाख लोक डेंटल इम्प्लांट करतात.

 

या प्रोजेक्टरवर आयआयटी दिल्लीचे प्रो. नरेश भटनागर आणि मौलाना आझाद इंस्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेजचे माजी डायरेक्टर महेश वर्मा यांनी काम केले आहे. प्रो. नरेश भटनागर यांनी सांगितले की, या प्रोजेक्टला सीएसआयआरने मदत केली आहे.

 

या टीमने जगभरातील 5 हजारांपेक्षा अधिक पेंटटवर रिसर्च केले. त्यानंतर 250 डिझाईन टेस्ट केले. त्यातील 249 अयशस्वी ठरले. 250 व्या चाचणीत चांगले मॉडेल मिळाले. हे काम वर्ष 2011 मध्येच पुर्ण झाले होते. त्यानंतर 30 ससे  आणि त्यानंतर 150 रुग्णांवर याचे परिक्षण करण्यात आले. अखेर 2017 साली एका कंपनीने हे तंत्र खरेदी करून फरिदाबाद येथे प्लांट लावला. मागील महिन्यातच याचे पेटंट मिळाले आहे.

 

प्रोफेसर भटनागर यांनी सांगितले की, परदेशातून भारतात येणाऱ्या मेडिकल डिव्हाईसच्या परिक्षणाचे नियम कठोर नाहीत. भारतात केवळ येथे तयार होणाऱ्या डिव्हाईसचीच तपासणी होते. परदेशी कंपन्या त्यांच्या देशातील टेस्ट सर्टिफिकेट दाखवून डेंटल इम्प्लांट विकतात. ते खूपच महाग असतात. सध्या सर्वात जास्त इस्त्रायलच्या डेंटल इम्प्लांटचा वापर केला जातो.

Find Out More:

Related Articles: