दहावीत नापास झालेल्या या पठ्ठयाने बनवले 35 स्वदेशी विमानांचे मॉडेल
गुजरातच्या वडोदरा येथे राहणाऱ्या 17 वर्षीय प्रिंस पांचाळने कमालची कामगिरी केली आहे. प्रिंस दहावीत नापास झाला होता. त्याचे लक्ष काहीतरी वेगळे करण्याकडे होते. त्याने स्वदेशी विमान मॉडेल बनविण्यास सुरूवात केली. ही विमाने रिमोटद्वारे कंट्रोल करता येतात.
प्रिंसने आतापर्यंत 35 पेक्षा अधिक स्वदेशी विमान मॉडेल तयार केली आहेत. ही मॉडेल्स बघायला लोकांची गर्दी होते. प्रिंस सांगतो की, त्याच्या आजोबांपासून त्याला ही प्रेरणा मिळाली.
प्रिंसने सांगितले की, जे मॉड्युल तयार करण्यात आले आहेत, ते बॅनर आणि होर्डिंग्समध्ये वापरण्यात आलेल्या प्लेक्सपासून बनविण्यात आलेले आहेत. 10वीत असताना नापास झालो, तेव्हा घरीच बसून असायचो. तेव्हा इंटरनेटवर सर्च करून मी विमान बनविण्यास सुरूवात केली.प्रिंसच्या या कामगिरीमुळे त्याला आजुबाजूचे ‘तारे जमीन पर’ मधील मुलगा म्हणून ओळखतात. प्रिंस पुन्हा 10 वीची परिक्षा देण्याचा विचार करत आहे.
तो म्हणाला की, जेव्हा ही मी अभ्यासाला बसतो, तेव्हा मला डोके जड झाल्यासारखे वाढते. मी तज्ञांची मदत घेणार आहे. आपल्या विमानांच्या मॉड्यूलबद्दल दुसऱ्यांना देखील माहिती मिळावी यासाठी प्रिंसने युट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याने आपल्या विमानावर मेक इन इंडिया देखील लिहिले आहे.