राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. आज १२३३ नवीन रुग्ण आढळून आले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळं मोठी चिंता निर्माण झाली आहे.
दरम्यान आज दिवसभरात २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ९० हजार ८७९ नमुन्यांपैकी १ लाख ७३ हजार ८३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले असून १६ हजार ७५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात २ लाख ११ हजार ११२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
चिंतेत टाकणारी बाब म्हणजे आज राज्यात ३४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनामुळं मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील २५, पुण्यातील ३, अकोला शहरात ३, जळगाव शहरात १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर १३ महिला आहेत. दरम्यान राज्यभरात आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळून आले आहे. हे आपण जाणून घेऊया.
https://mobile.twitter.com/rajeshtope11/status/1258049845891346438?ref_src=twsrc%5Egoogle%7Ctwcamp%5Eserp%7Ctwgr%5Etweet