राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3202 वर, एकट्या मुंबईत 2043 रुग्ण

Thote Shubham
मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचे थैमान काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. दर तासाला कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या कालावधीत राज्यात 286 रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता 3202 वर पोहचला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. तर या आजारातून 300 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. राज्यातील रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. 


आज दिवसभरात एकट्या मुंबईत तीन जणांच्या मृत्यूसह आतापर्यंत 107 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 2 हजार 43 वर पोहचला आहे. या आकडेवारीत आतापर्यंत मृत्यू झालेल्या 116 जणांचा समावेश आहे.

देशातसुद्धा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजणा करण्यात येत आहेत. एवढंच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेसोबतही चर्चा झाल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

कोरोना बाबत आपल्याला अधिकच सतर्क राहावं लागणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. 

https://mobile.twitter.com/rajeshtope11/status/1250828538267213831?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1250828538267213831&ref_url=https%3A%2F%2Famnews.live%2F

Find Out More:

Related Articles: