बाजारपेठेत इलेक्ट्रिक सायकल लाँच, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Thote Shubham
देशातील आर्थिक मंदीमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रालाही उतरती कळा लागली आहे. त्यातच आता बाजारपेठेत एक इलेक्ट्रिक सायकल लाँच करण्यात आली आहे. एक लाखाहून अधिक या सायकलची किंमत आहे. इलेक्ट्रिक सायकलची किंमत

पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रसिद्ध सायकल निर्माती कंपनी हिरो आणि मोटर कंपनी यामाहाने पहिल्यांदाच एकत्र येत इलेक्ट्रिक सायकल बाजारात लाँच केली आहे. आधुनिक आणि विशेष पद्धतीने ही सायकल तयार केली आहे. तसेच काही खास फिचरही यामध्ये देण्यात आले आहेत. पण सर्वांचे लक्ष या सायकलची किंमतीने केंद्रित केले आहे. तब्बल 1 लाख 35 हजार रुपये या सायकलची किंमत आहे.

30 टक्के लोक सध्या गाड्या चालवतात ते आरोग्याबाबतीत जागृत आहेत आणि सायकल चालवणे पसंत करतात. ही सायकल याच पार्श्वभूमीवर लग्झरी आणि आरोग्यदायी सुविधांवर लक्ष केंद्रित करत लाँच केली आहे. Lectro EHX20 असे हीरो आणि यामाहाच्या या सायकलचे नाव असल्याचे हिरो कंपनीचे एमडी पंकज मुंजाल यांनी सांगितले.

बाजारात मिळणाऱ्या इतर इलेक्ट्रिक सायकलच्या तुलनेत या सायकलमध्ये बॅटरीने चालणारे इंजिन मागच्या बाजूला नसून पुढच्या बाजूला आहे. ही सायकल रिट्रीट असल्यामुळे पेडल मारुनही चालवली जाऊ शकते आणि बॅटरीच्या सहाय्यानेही सायकल चालवली जाऊ शकते. हीरो आणि यामाहाच्या या नव्या सायकलचा लुक सर्वांना आकर्षित करत आहे. सायकलमध्ये आधुनिक गिअरही दिले असून त्यामध्ये अनेक खास फीचर दिलेले आहेत. ही सायकल सर्वात महागडी सायकल नसून याशिवाय पाच ते सहा लाख रुपयांच्याही सायकल बाजारात उपलब्ध आहेत.


Find Out More:

Related Articles: