पुढच्या महिन्यात लाँच होऊ शकतो महागडा 'आयफोन 11 प्रो'

मोबाईल क्षेत्रात महागड्या स्मार्टफोनचे उत्पादन करणारी अॅपल कंपनी ‘आयफोन एक्स’ सिरीजनंतर आपला कोणता नवा आयफोन लाँच करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच आता एक महिन्यांपेक्षा कमी कालावधी नवीन आयफोन डिव्हाइस लाँच होण्यासाठी उरला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ‘आयफोन ११ प्रो’ या नावाने अॅपल आयफोन लाँच करणार आहे. यासंदर्भातील वृत्त एका फ्रेंच वेबसाइट दिले असून त्यांना ‘आयफोन सॉफ्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, सगळ्यात महाग असे आयफोन एक्सएस मॅक्स’चं नवीन व्हर्जन असणार आहे. ‘आयफोन ११ प्रो मॅक्स’ असे या फोनचे नाव असण्याची शक्यता आहे. हा आयफोन सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे.

खास फिचर ‘अॅपल आयफोन ११’मध्ये देण्यात येणार आहेत. आयपॅडमध्ये असणारी ‘अॅपल पेन्सिल’ आता ‘आयफोन ११’मध्येही असण्याची शक्यता आहे. अधिक क्षमतेची बॅटरी व तीन रिअर कॅमेरा नवीन फोनमध्ये आहेत. १० मेगापिक्सल फ्रंट क्रमेरा व १४ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. अॅपल कंपनी फोनच्या किंमतीत अधिक वाढ करणार नसल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आयफोनची विक्री बाजारात वाढावी यासाठी कंपनी किंमतीत फारसा बदल करणार नसल्याचे म्हटले जात आहे.


Find Out More:

Related Articles: