मातोश्रीवर फोन करून धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक

Thote Shubham
काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर एक धमकीचा फोन आला होता. या फोनमुळे फार खळबळ माजली होती. मात्र या धमकीच्या फोन प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी कारवाई करत मतोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. दया नायक यांनी या प्रकरणाचा तपास करत कोलकात्याहून आरोपीला अटक केली आहे. पलाश बोस असं या व्यक्तीचे नाव आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांच्या निवसास्थानी म्हणजेच मातोश्रीवर धमकीचा फोन आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने दुबईवरून फोन करून ही धमकी दिली होती.

तर उद्धव ठाकरेंप्रमाणे शरद पवार आणि अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले होते. या धमकीच्या फोनची चौकशी सुरक्षा यंत्रणा करत होती. फोन करणारा व्यक्ती कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता.


Find Out More:

Related Articles: