टीम इंडियाचे न्यूझीलंडसमोर 348 धावांचे आव्हान

Thote Shubham

हेमिल्टन : टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील पहिला सामन्यात निर्धारित 50 षटकात चार गडी गमावत 347 धावा केल्यामुळे विजयासाठी न्यूझीलंडसमोर 348 धावांचे आव्हान आहे. टीम इंडियाने श्रेयस अय्यरच्या दमदार शतक, केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर 347 धावांची मजल मारली.

 

हा सामना हेमिल्टनच्या सेडॉन पार्कमध्ये खेळवण्यात येत आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवालला या एकदिवसीय सामन्यात पदार्पणाची संधी दिली. याशिवाय कुलदीप यादव आणि केदार जाधवचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश झाला आहे.

 

न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात मुंबईकर श्रेयस अय्यरने शतक झळकावून भारतीय डावाला आकार दिला. एकदिवसीय सामन्यातील श्रेयस अय्यरचे हे पहिलेच शतक आहे. 101 चेंडूंत त्याने शतक झळकावले. त्याच्या या खेळीत 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. तो 107 धावा करुन बाद झाला. न्यूझीलंडतर्फे टिम साऊदीने दोन, ग्रॅण्डहोम आणि ईश सोढीने प्रत्येकी एक विकेट घेतली.                                                                                                                  

Find Out More:

Related Articles: