दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियमला आता अरुण जेटलींचे नाव

frame दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियमला आता अरुण जेटलींचे नाव

Thote Shubham

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे दिल्लीच्या फिरोज शाह कोटला मैदानाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्यात येणार आहे. अरुण जेटली यांचे (ता.२४) शनिवारी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.१२ डिसेंबरला कोटला मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी कोटला स्टेडियमला अरुण जेटली असे नाव देण्यात येणार आहे.

दिल्ली क्रिकेट असोशियनचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी सांगितले की ज्या व्यक्तिच्या संरक्षणामुळे मैदान तयार करण्यात आले. त्या मैदानाला त्याच व्यक्तिचे नाव देणे आवश्यक आहे  . अरुण जेटली यांनी जे काम केले आहे, त्यामुळं दिल्ली क्रिकेटचा स्थर उंचावला आहे. त्यांच्यामुळं विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर,या सारखे खेळाडू भारताला मिळाले आहेत.

दरम्यान याचवेळी स्टेडियममधील एका स्टँडला भारताचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये होणार असून याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि क्रीडामंत्री किरण रिजीजू यांची उपस्थिती असणार आहे.


Find Out More:

Related Articles:

Unable to Load More