बाहेरच्या राज्यातून येणारे दूध सीमेवरती आडवा, राजू शेट्टी यांची मागणी

Thote Shubham

कोल्हापूर : सध्या राज्याच्या सीमा पोलिसांनी बंद केल्या आहेत तेव्हा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यातून येणारे दुधाचे टँकर सीमेवरच अडवण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय.  तसेच अतिरिक्त दूर खरेदीचा राज्यसरकार वरती बोजा कमी होईल असं राजू शेट्टी आणि म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.


 शेतीमाला व्यापाराला राज्याच्या सीमा असू नयेत अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. मात्र सध्याचा काळ हा असाधारण काळ आहे. यामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन झालेला आहे. अशा परिस्थितीत दुधाची टंचाई असतानासुद्धा एकाबाजूला ग्राहकांना दूध मिळत नाही तर दुसर्‍या बाजूला उत्पादकांचे दूध खपत नाही ही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


या असाधारण काळामध्ये  शेतकऱ्यांचं उत्पादित झालेले दूध वाया जाऊ नये म्हणून राज्यसरकारने दररोज दहा लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा परिस्थितीत लॉक डाऊन चा एक भाग म्हणून सगळ्या राज्याच्या सीमा बंद करून ठेवलेले आहेत. सीमेवरती पोलीस आहेत.


पोलिसांना कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यावरून यावरून येणारे दुधाचे टँकर अडवण्यात सांगावेत अशी विनंती राज्य सरकारला आहे. कारण सध्या राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतले पैसे खर्च करून दूध खरेदी करत आहे अशावेळी काही लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी व्यापार करण्यासाठी बाहेरचं दूध घेत आहेत. बाहेरच्या राज्यातून येणारे दुधाचे टँकर सीमेवरच रोखणं गरजेचं असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

Find Out More:

Related Articles: