“मला डाऊट होताच यांना मी प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना पाहिलं होतं” - निलेश राणे

Thote Shubham
पुणे : देशात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभारत करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्व नागरिक घरीच आहेत. जीवनावश्यक वस्तू घेण्याशिवाय बाहेर पडण्यास सर्वांना मनाई करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत घरात बसून सर्वचजण काहीना काही करत आहेत. अशा लॉकडाऊनच्या परिस्थितीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील आपला हार्मोनिअमचा छंद जोपासला आहे.


घरात बसून त्यांनी हार्मोनिअम वाजवतानाचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता. या व्हिडीओवरून भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राऊत यांच्या पेटीवादनाचा खालच्या पातळीवर जाऊन समाचार घेतला. निलेश राणे यांच्या डोक्यात गेलेल्य काही नेत्यांत राऊत यांचा वरचा क्रमांक आहे. त्यामुळे “आईशपथ मला डाऊट होता संज्याला मी चर्चगेट स्टेशन प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना फाटक्या कपड्यात बघितलं होतं. आज खात्री झाली,” अशा शब्दात त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.

यापूर्वीही निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. यावेळीही त्यांनी पेटीवादनावरूनही असेच खालच्या पातळीवरचे मत नोंदवले. राऊतांच्या अशा कृतीलाही राणे यांनी घेतलेला हा आक्षेप अत्यंत निंदनीय आहे. मात्र दुसरीकडे नेटकऱ्यांनी राऊतांच्या पेटीवादनाचे कौतुक केले आहे. आजकालची पिढी मोबाईलशिवाय राहू शकत नाही. मात्र राऊत यांनी चांगला छंद जोपासला, असे मत व्यक्त केले.

Find Out More:

Related Articles: