‘मद्यपान’करून वाहन चालवणाऱ्यांमुळे तीन वर्षांत ४१ हजार अपघात – नितीन गडकरी

Thote Shubham

गेल्या २०१६ ते २०१७ वर्षांमध्ये मद्यपान करून वाहन चालवणार्यांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. यामुळे २०१६ मध्ये १४ हजार ८९४, २०१७ मध्ये १४ हजार ७१ आणि २०१८ मध्ये १२ हजार १८ अपघात झाल्याचे रस्ते, परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले.

 

यावेळी बोलताना पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘मोटर वाहन कायद्यानुसार मद्यपान करून वाहन चालवल्यास तुरुंगवास आणि दंड अशा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. मंत्रालयाकडून सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

 

गिरीधारी यादव आणि रमा देवी यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला नितीन गडकरी यांनी लोकसभेत उत्तर दिले. ‘केंद्र सरकारने अहमदनगरमध्ये स्वदेश आणि प्रसाद योजना सुरू करावी,’ अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

 

याबाबत बोलताना विखे म्हणाले, ‘अहमदनगरला सांस्कृतिक वारसा असून शिर्डीतील साईबाबा मंदिर, नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर, अशी अनेक धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने अहमदनगरमध्ये स्वदेश आणि प्रसाद योजना सुरू करावी,’ अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

                                                        
 

Find Out More:

Related Articles: