म्हणून राष्ट्रवादीला गृहमंत्रीपद देऊ नका; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला सल्ला

Thote Shubham

महाविकास आघाडी मध्ये गृहमंत्रिपदावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तसेच राज्यात ठाकरे सरकार येऊन २० दिवस उलटून गेले आहेत. अखेर मंत्रीमंडळ मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार येत्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.

 

ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंनी ठरवावं काय करावं, पण खूप वर्ष आम्ही एकत्र काम केलंय, म्हणून माझं व्यक्तिशः प्रेम आहे त्यांच्यावर. गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला देऊ नका. ओ, काहीच ठेवत नाही तुम्ही हातामध्ये. गृहमंत्र्यांकडे सगळं असतं. तुम्ही सगळंच देऊन टाकलं गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला दिलंत, तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील,’ असे पाटील म्हणाले.

 

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, ‘फक्त मुख्यमंत्रिपद? बाकी तुमच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. तसेच ते म्हणाले, तुम्ही फायनान्स देऊन टाकलं, महसूल दिलं, सार्वजनिक बांधकाम दिलं, मग ठेवलं काय? असा प्रश्न पाटील यांनी विचारला.                                                                                                                                                                           

 

 

Find Out More:

Related Articles: