आजच्या राजकारणाची स्थिती ‘सिंहासन’ चित्रपटासारखी – खडसे
‘सध्याची राजकीय परिस्थिती ही मराठीत प्रचंड गाजलेल्या ‘सिंहासन’ सिनेमासारखी आहे,’ असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले. एवढंच नाही तर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना ‘सामना’ सिनेमातल्या डॉ. श्रीराम लागूंसारखं मी त्यांना ‘मारुती कांबळेचं काय झालं? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.
ते जळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात खडसे बोलत होते. राजकारणातील माणसं आवरता आवरत नाहीत आणि सावरता सावरत नाहीत, असंही खडसे यावेळी बोलताना म्हणाले. जेव्हा एखाद्यावर अन्याय व्हायचा तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना विचारायचो त्या मारोती कांबळेचं काय झालं, असे ते म्हणाले.
दरम्यान, राजकारणात आणि सिनेमात रस असलेल्या प्रत्येकाने हा सिनेमा पाहिलाच असेल. आता या सिनेमाचा उल्लेख होण्याचं कारण एकनाथ खडसेंनी या सिनेमाची आठवण केली. खडसेंना सिंहासन सिनेमा आठवायचं कारण म्हणजे या व्यासपीठावर खडसेंसोबत सिंहासन सिनेमाचे दिग्दर्शक जब्बार पटेलही होते.