अमित शहांचा शिवसेनेला ‘मुख्यमंत्री’ व ‘गृहमंत्री’ पद देण्यास नकार

Thote Shubham

महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरुन असलेला तणाव समोर आला आहे. सूत्रांच्या मते भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद देण्यास नकार दिला आहे. अमित शाह यांनी शिवसेनेची राज्यातील वागणूक पाहता वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

असे सांगण्यात येत आहे की शिवसेनेला महसूल विभाग देण्यास भाजप तयार आहे. परंतू सूत्रांनुसार शिवसेना अजूनही भाजपशी चर्चेपासून दूर आहे.असे देखील सांगितले जात आहे की, भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दरम्यान होणार्‍या बैठकांवर नजर ठेवून आहे. सूत्रांच्या मते भाजपची शिवसेनेबरोबर मुख्यमंत्री पदावरुन अजून कोणतीही चर्चा झाली नाही. तर भाजपला विश्‍वास आहे की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही.

पक्षाच्या मते 8 नोव्हेंबरपर्यंत राज्यात सरकार स्थापन होईल.याआधी देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला की लवकरच राज्यात सरकार स्थापन होईल. परंतू त्यांनी या व्यतिरिक्त काहीही बोलणे टाळले.अमित शाह यांच्याशी भेट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मी काही लोकांनी केलेल्या व्यक्तव्यावर काही बोलू शकत नाही, मला फक्त एवढेच सांगायचे आहे की नवे सरकार लवकरच स्थापन होईल असा मला विश्‍वास आहे.                                                        

Find Out More:

Related Articles: