शिवसेनेने ठरवले तर आवश्यक ते बहुमत सिद्ध करू शकतो – संजय राऊत

frame शिवसेनेने ठरवले तर आवश्यक ते बहुमत सिद्ध करू शकतो – संजय राऊत

Thote Shubham

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेने ठरवले तर आवश्यक ते बहुमत सिद्ध करू शकतो असे म्हटले आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा असल्याचे पुढे ते म्हणाले. संजय राऊत शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा पुनरुच्चार केला.

राऊत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्रिपदासह सत्तेत आम्हाला समसमान वाटप हवे आहे. आजच मुख्यमंत्र्यांनी शपथ घ्यायला काय हरकत आहे? यासाठी ते 8 दिवस का थांबले? भाजपने चर्चा का सुरू केली नाही. भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी खुशाल शपथविधी करावा. परंतु स्थिर सरकारसाठी शिवसेना बहुमत सिद्ध करेल, असे म्हणून संजय राऊतांनी मोठा इशाराच भाजपला दिला.

दरम्यान गुरुवारी शरद पवार यांची संयज राऊत यांनी भेट घेतली होती. कोणतेही राजकीय कारण पवारांच्या भेटीमागे नव्हते. आमच्यात बळीराजाच्या प्रश्नावर चर्चा झाली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात आहे. राज्यात सध्या सरकार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच आम्ही पवारांशी चर्चा केली, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.                                                                             


Find Out More:

Related Articles:

Unable to Load More