या विधानसभेला मनसेचा आमदार निवडून येणार म्हणजे येणार : राज ठाकरे

Thote Shubham

कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचाराचा झंझावत सध्या राज्यभर सुरु आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी निवडून द्या असे आवाहन करणाऱ्या राज ठाकरेंनी आज कल्याणमधील सभेतही ही घोषणा  केली. “येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे आमदार निवडून येणार म्हणजे येणारच, कारण महाराष्ट्राला मी तशीच हाक दिली आहे. या सगळ्या सत्ताधाऱ्यांवर कोणाचा अंकुश ठेवायचा असेल, तर विरोधी पक्ष प्रबळ पाहिजे” असे राज ठाकरे कल्याणमधील सभेदरम्यान म्हणाले.

“आतापर्यंत विरोधी पक्षासाठी कोणीही मत मागितली नाही. कारण महाराष्ट्राची स्थिती अशी आहे. सरकारवर कोणतेही निर्बंध नाहीत. फक्त भाषण करायची. भाषण नाही थापा मारायच्या,” अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.

सध्या सत्ताधारी पक्षातील सुरु असलेल्या इनकमिंगवरही त्यांनी टीका केली. बाकीचे राजकीय पक्ष हे बंडखोरीने पोखरलेले आहेत. कोणी नगरसेवक राजीनामे देतात. बंडखोरी करतात. सगळ्या गोष्टी सुरु आहेत. आपलं बरं आहे ठणठणीत, असेही राज ठाकरे म्हणाले.

“जवळपास 30 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार असं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. एकीकडे उद्योगधंदे बंद होत असल्याने खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या जात आहेत आणि आता सरकारी पण असा प्रश्नही राज ठाकरे यांनी सरकारला विचारला. तसेच भाजपची घोषणा होती 2014 ला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, आज आम्ही विचारतोय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? असेही ते यावेळी म्हणाले.”          

Find Out More:

Related Articles: