
येत्या दोन ते तीन दिवसांत आचारसंहिता जाहीर होणार - चंद्रकांत पाटील
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकांच्या तारखा पाहता १८ – २० सप्टेंबरला निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
परंतु आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीचे संकेत वर्तवले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत आचारसंहिता जाहीर होणार असून १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान मतदान पार पडेल, असे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशावेळी पाटील बोलत होते.
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, आम्ही माढा शरद पवारांना पाडा बरोबरच सुप्रिया ताईना घरी पाठवण्याचा प्रयत्न केला. हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेच्या दोन दिवस आधी भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता, तसं झालं असत तर बारामतीमध्ये वेगळे चित्र पहायला मिळाले असते. हर्षवर्धन पाटील यांच्या येण्याने आणखीन भाजपची एक जागा वाढली आहे.