युतीचा मुख्यमंत्री भाजपचा की शिवसेनेचा? - रामदास आठवले

Thote Shubham

महाराष्ट्रात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला असणार नाही. ज्याच्या जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री होईल, असं भाकीत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे. ते सोमवारी रात्री उल्हासनगरमधील एका कार्यक्रमासाठी आले असताना बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, “आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही. महाराष्ट्रात ज्याच्या जास्त जागा येतील, त्याचाच मुख्यमंत्री होईल आणि राज्यात भाजपच्याच सर्वाधिक जागा येतील.”

‘शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाही, तर उपमुख्यमंत्रीपद मिळेल’

शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याची हवा काढतानाच आठवले यांनी त्यांनी उपमुख्यमंत्रीपद जरुर मिळेल, असंही भाकीत वर्तवलं. दुसरीकडे गणपती झाल्यानंतर जागावाटपाची अंतिम चर्चा होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

‘आरपीआयची 25 जागांची मागणी’

एकीकडे शिवसेनेच्या दाव्याला अतिशयोक्ती ठरवताना स्वतः रामदास आठवलेंनी देखील असाच दावा केला. ते म्हणाले, “जागावाटपाची अंतिम चर्चा होणार आहे. त्यात आरपीआयने घटकपक्षांसाठी 25 जागांची मागणी केली आहे. त्यापैकी किमान 10 जागा आरपीआयला मिळतील.”                                                                                                      


Find Out More:

Related Articles: