मुस्लिम देशांना या मध्ये पाडू नका : युएई परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला
सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमीरात (युएई) च्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक दिवसीय पाकिस्तानी दौरा केला. यावेळी अरब अमीरातने काश्मीर मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
सौदीचे उपपरराष्ट्र मंत्री अदेल बिना अहमद अल-जुबैर आणि युएईचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला हे इस्लामाबाद येथे आले होते. यावेळी बोलताना शेख अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले की, काश्मीर हा भारत-पाकिस्तान यांचा द्विपक्षीय मुद्दा आहे. मुस्लिम देशांना या मध्ये पाडू नका. ते म्हणाले की, काश्मीरचा मुद्दा हा भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यान चर्चेने सोडवला गेला पाहिजे.
यावेळी पाकिस्तानने दोन्ही देशांसमोर काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा समोर ठेवला. मात्र याचा कोणताही परिणाम झाला नाही.
आतापर्यंत काश्मीर मुद्यावर पाकिस्तानची कुटनिति अयशस्वी ठरली नाही. मुस्लिम देशांबरोबरच एकाही देशाने पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही.
युएईने काही दिवसांपुर्वीच नरेंद्र मोदी यांचा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान केला होता. पाकिस्तान सरकारने संयुक्त राष्ट्राच्या सभेत देखील काश्मीरचा मुद्दा मांडला होता, मात्र तेथेही त्यांना यश आले नाही.