आदित्य ठाकरेंची पूरग्रस्त भागाला भेट,लवकरात लवकर मदतीचे दिले आश्वासन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील पूरग्रस्त भागाचा आढावा आज शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतला. आदित्य ठाकरे यांनी बांदा, असनिये , झोळंबे, आणि माणेरी या पूरग्रस्त भागामध्ये जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी यावेळी पुरामुळे नुकसान झेलेल्या नागरिकांशी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधून लवकरात लवकर मदतीचे आश्वासन दिले.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांना, भांडी, डाळ, चटई, चादर, साखर आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या भागामध्ये नागरिकांना धनादेशाचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. ठाकरे यांनी यावेळी पूरग्रस्तांना खचून न जाता गरज लागल्यास शिवसेनेची आठवण काढण्याचे आवाहन त्यांनी केले.
यासह आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा, असनिये , या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. माणेरीसह दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे या पूरग्रस्त भागाची आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली.यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर आणि सचिन आहिर यांची उपस्थिती होती.