
बॉलिवूडमधील या 5 व्यक्तींनी सलमान खानशी घेतला पंगा!
बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान आपल्या दोस्तीसाठी हिंदी सिनेसृष्टीत ओळखला जातो. त्याचप्रमाणे त्याच्यासोबत पंगा घेणाऱ्या व्यक्तींशी तो कधीही बोलत नाही. अशाच त्याच्याशी पंगा घेतलेल्या व्यक्तींची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

संजय लीला भन्साळी यांच्या काही चित्रपटात सलमानने काम केले होते. पण कालांतराने या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि त्यानंतर सलमानने भन्साळी यांच्या चित्रपटात काम करणे बंद केले.

विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यामधील वैर सर्वश्रृत आहे. असे म्हटले जाते की विवेकमुळेच सलमान आणि ऐश्वर्याचे नाते तुटले होते. विवेकसोबत या प्रकरणावरुन सलमानने हाणामारी देखील केली होती. दोघे आजही एकमेकांशी बोलत नाहीत.
वहिनी मलायका अरोरासोबत अर्जुन कपूरच्या नात्यामुळे अर्जुनला सलमानने आपला वैरी केले. अर्जुन सलमानमुळेच बॉलिवूडमध्ये आला होता. आता दोघांमध्ये विस्तवही जात नाही.
फार जूने असे सरोज खान आणि सलमान खान यांच्यातील वैर आहे. सलमान आणि सरोज यांच्यात अंदाज अपना अपना चित्रपटाच्यावेळी कठीण डान्स स्टेप दिल्यामुळे वाद झाला होता. त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत कधीच काम केले नाही.
एका पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या वेळी सलमान खान आणि गायक अरिजित सिंहमध्ये भांडण झाले होते. अरिजितला सलमानने ‘झोपलेला’ असे म्हटले. त्याच्या वक्तव्याला अरिजितने प्रत्युत्तर दिले होते. यानंतर अरिजित आणि सलमानने कधीही एकत्र काम केले नाही.