
ह्रतिक झाला या देसी ‘मायकल जॅक्सन’चा फॅन
टिकटॉकवर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका मुलाचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. बॉलिवुड अभिनेता ह्रतिक रोशन देखील या मुलाच्या डान्सचा फॅन झाला आहे. हा मुलगा मायकल जॅक्सन प्रमाणे मूनवॉक करतो. ह्रतिक रोशनने देखील या मुलाचे कौतूक केले.
एका ट्विटर युजरने ह्रतिक रोशनला टॅग करत व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, शेवटपर्यंत पहा. मी सर्व व्हिडीओ जोडून हे बनवले आहे. प्लीज, ह्याला प्रसिद्ध करा. यावर ह्रतिकने व्हिडीओ रिट्विट करत लिहिले की, मी पाहिलेला आतापर्यंतचा सर्वात स्मूथ एअरवॉकर. कोण आहे हा व्यक्ती ?
या व्हिडीओला आतापर्यंत 1 मिलियनपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहे. या डान्सरचे नाव युवराज सिंह असून, त्याचे टिकटॉकवर तब्बल 1.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.