‘या’ दिवशी रिलीज होणार ‘स्ट्रीट डान्सर’चा ट्रेलर

Thote Shubham

गेल्या बऱ्याच दिवसांपासून अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य जोडी असलेला ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षकांना आतुरता आहे. हा ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी२’ या चित्रपटांचाच तिसरा भाग आहे. या चित्रपटाचे शूटिंग काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. आता लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात येणार आहे.

 

ट्रेलर रिलीजच्या तारखेची घोषणा या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांच्या वाढदिवशीच करण्यात आली. भूषण यांच्या वाढदिवसाचा केक कापून श्रद्धा आणि वरुणने सेलिब्रेशनही केले. त्यांनी यावेळी आपल्या चित्रपटाचा ट्रेलर केव्हा रिलीज होईल, असा प्रश्न विचारला. तेव्हा या तारखेची घोषणा भूषण यांनी केली.

 

या चित्रपटाचा १२ डिसेंबरला ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही यांची मुख्य भूमिका आहेत. तसेच, डान्स क्षेत्रात पारंगत असलेले कलाकारही यामध्ये झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुजाने केले आहे.

 

 

 

Find Out More:

Related Articles: