ग्रीन झोनमधील निर्बंध आणखी शिथिल करणार, रेडझोनला दिलासा नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Thote Shubham
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांसोबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. संवाद साधत असतांना त्यांनी वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊन थोडाफार शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती दिली.  

तसेच पंतप्रधान मोदींच्या भाषेत महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्यासाठी आता ग्रीन झोनमधल्या लोकांनी पुढे यावं असं त्यांनी म्हंटल आहे. आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्र वाचवण्यासाठी घरात राहिलात सरकारनं दिलेल्या सूचनांचे पालन केलं आणि कोरोनाशी लढा दिला. मात्र आता ग्रीनझोनमध्ये मनुष्यबळ कमी पडल्यास ग्रीन झोनमधल्या माणसांनी पुढे या असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.


ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आणखी काही निर्बंध शिथिल होणार, असं त्यांनी म्हंटल आहे. मात्र महापालिका क्षेत्रातल्या रेड झोन क्षेत्रांमध्ये निर्बंधांमध्ये फारशी शिथिलता आणता येणार नाही, असंही त्यांनी बोलतांना म्हंटल आहे.

सध्या महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये कुणालाही डांबून ठेवण्याचा आमचा उद्देश नाही असं त्यांनी म्हंटल आहे. राज्यभरात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जर आपण लॉकडाऊन केलं नसतं, संचारबंदी केली नसती तर रुग्णसंख्या किती झाली असती, किती लोकांनी आपला जीव गमवला असता याची कल्पना न केलेलीच बरी असं त्यांनी म्हंटल आहे.

लॉकडाऊन हा गतिरोधक म्हणून काम करत असल्याचं त्यांनी नागरिकांना सांगितलं आहे.  सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन असला तरी आजपर्यंत 50 हजार उद्योग सुरू झाले असून 5 लाख मजूर आणि कामगार काम करू लागले आहेत.

70 हजार उद्योगांना परवानगी दिली असली तरी महापालिका क्षेत्रात निर्बंध अजूनही कडक आहेत. महापालिकांच्या व्यतिरिक्त इतर भागात उद्योग सुरू झाले आहेत असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

Find Out More:

Related Articles: