देशातील लॉकडाउन वाढलं ! 3 मे पर्यंत सर्व राहणार बंद - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Thote Shubham
नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांच लॉकडाउन घोषित केलं होते. आज हे 21 दिवस पूर्ण होत आहे. यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं आहे. यावेळी देशभरातील लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे.

येत्या 3 मेपर्यंत देश पूर्णपणे बंद राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. राज्याशी चर्चा केल्यानंतर सर्वांच्या सूचना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. 


कोरोनाविरोधातील लढा आपण यशस्वीरित्या लढत आहोत. अनेक संकटांचा सामना करुन देशवासिय या लढ्यात साथ देत आहेत. देशासाठी तुम्ही सर्व कर्तव्य पार पाडत आहेत. देशातील सर्व नागरिकांना माझे नमन म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आपली शिस्त ही बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 


इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी काम केले आहे. तुम्ही सर्व यामध्ये सहभागी आहात तसेच साक्षीही आहात. देशात एकही कोरोना रुग्ण नसताना भारताने कोरोना प्रभावित देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू केली.

तसेच देशातील रुग्णांचा आकडा 100 होण्याच्या आधीच देशाने विदेशातील प्रवाशांना 14 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. 450 रुग्ण असताना भारताने देश 21 दिवसांसाठी लॉकडाउन केला. समस्या वाढण्याची वाट न पाहता समस्या पाहताच योग्य ते निर्णय घेतले. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


या संकटाची तुलना कोणत्याही देशाशी करणे योग्य नाही. मात्र सत्य नाकारता येत नाही. जगातील मोठमोठ्या देशांच्या तुलनेत आज भारत चांगल्या परिस्थितीत आहेत. महिना दिड महिन्यापूर्वी अनेक देश कोरोनासंक्रमनाच्या प्रकरणात भारताच्या बरोबरीत होते.

मात्र आज त्या देशात कोरोनाच्या केसेस भारताच्या तुलने 25 ते 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्या देशांमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. भारताने योग्य ती काळजी घेतली नसती, योग्य वेळी योग्य निर्णय घेतले नसते तर आज भारताची स्थिती वेगळी असती. त्याची कल्पना न केलेलीच बरी असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Find Out More:

Related Articles: