लॉकडाऊन : ‘जबाबदारीने इंटरनेटचा वापर करा’, दूरसंचार संघटनेचे आवाहन

Thote Shubham

देशभरात लॉकडाऊनची स्थिती असताना दूरसंचार कंपन्यांचे संघटन सेल्यूलर ऑपरेटर्स ऑफ इंडियाने (सीओएआय) मोबाईलधारकांना जबाबदारीने इंटरनेटचा वापर करा, असे आवाहन केले आहे. जेणेकरून दूरसंचार नेटवर्कच्या मूळ स्ट्रक्चरवरील दबाव कमी होईल व याच्याशी जोडलेल्या महत्त्वपुर्ण सेवा सुरळीत सुरू राहतील.

लॉकडाऊनमुळे अनेक कर्मचारी घरून काम करत आहेत. तसेच नागरिक घरात कैद असल्याने ऑनलाईन स्ट्रिमिंग आणि गेमिंगचा आनंद घेत आहेत. अशा परिस्थिती मागील काही दिवसात इंटरनेटचा वापर 30 टक्क्यांनी अधिक वाढला आहे.

सीओएआयचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी सांगितले की, लोकांना विनाकारण इंटरनेटचा अधिक वापर न करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यांनी जबाबदारीने याचा वापर करावा, जेणेकरून ऑनलाईन शिक्षण, डिजिटल आरोग्य सेवा, पेमेंट आणि इंटरनेटशी जोडलेल्या इतर सेवा विना अडथळा सुरू राहतील.

याशिवाय  गूगल, फेसबुक, टीक-टॉक, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, हॉटस्टार, एमएक्स प्लेयर, जी आणि सोनी सारख्या व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मला एचडी व्हिडीओ न दाखवता केवळ एसडी व्हिडीओ दाखवण्यास सांगण्यात आले आहे.

Find Out More:

Related Articles: