फेसबुक मेसेंजरचे डेस्कटॉप अॅप लाँच
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या युजर्सचा चॅटिंग अनुभव अधिक चांगला करण्यासाठी डेस्कटॉप मेसेंजर अॅप लाँच केले आहे. आता युजर्स आपल्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर फेसबुक मेसेंजर अॅपद्वारे चॅटिंगसह व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलिंग करू शकणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात नातेवाईक, मित्र-मैत्रिणींशी संपर्कात राहण्यासाठी हे अॅप फायदेशीर ठरेल.
युजर्सला या अॅपमध्ये जीफ आणि नॉटिफिकेशन सपोर्ट देखील मिळेल. या डेस्कटॉप व्हर्जनची खास गोष्ट म्हणजे यात युजर्सला डार्क मोड देखील दिले आहे. फेसबुक मेसेंजर डेस्कटॉप अॅपला माइक्रोसॉफ्ट स्टोर आणि मॅक अॅपस्टोरवरून डाउनलोड करता येईल. रिपोर्टनुसार, लॉकडाऊनच्या काळात फेसबुक मेसेंजर अॅपच्या युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अॅपचा वापर करून व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे.