जपान फिरण्यासाठी आयआरसीटीसीने आणले स्वस्तात मस्त पॅकेज

frame जपान फिरण्यासाठी आयआरसीटीसीने आणले स्वस्तात मस्त पॅकेज

Thote Shubham

इंडियन रेल्वे कॅटेरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीने जपान फिरण्यासाठी एक टूर पॅकेज आणले आहे. या पॅकेजमध्ये प्रवाशांना 7 दिवस आणि 6 रात्र जापानमध्ये घालवण्याची संधी मिळेल. आयआरसीटीसीच्या या पॅकेजचे नाव ‘जॉयस ऑफ जपान’ आहे. 7 दिवस आणि 6 रात्रींच्या या पॅकेजमध्ये प्रवाशांना नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण देखील मिळेल.

 

या प्रवासाची सुरूवात 26 फेब्रुवारीला होईल. हे टूर पॅकेज मुंबई विमानतळापासून सुरू होईल. या पॅकेज अंतर्गत प्रवासी जपानची राजधानी टोकियो व्यतरिक्त माउंट फूजी, हिरोशिमा, ओसाका, क्यूटो देखील पाहू शकतील. 26 फेब्रुवारीला रात्री 10 वाजता मुंबईवरून टोकियोच्या दिशेने विमान उड्डाण घेईल. 11-12 तासाच्या प्रवासानंतर विमान टोकियोला पोहचेल. तेथे फिरल्यानंतर माउंट फूजी, हिरोशिमा, ओसाका, क्यूटो फिरल्यानंतर परत 3 मार्चला टोकियोला यावे लागेल. जेथे सकाळी 11.45 वाजता मुंबईवरून उड्डाण घेईल आणि सायंकाळी सहा वाजता मुंबईत पोहचेल.

 

एका व्यक्तीसाठी हे पॅकेज महागडे ठरेल. एका व्यक्तीसाठी या संपुर्ण पॅकेजचा खर्च 2,06,000 रुपये आहे. तर 2 आणि 2 व्यक्तींसाठी 1,72,000 रुपये (प्रति व्यक्ती) भरावे लागतील. याशिवाय 2 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी बेडसोबतचे पॅकेज 1,72,000 रुपये आणि विना बेडचे पॅकेज 1,38,000 रुपये आहे.

 

Find Out More:

Related Articles: