बस, ट्रेन प्रवासाची ‘ही’ कटकट संपवण्यासाठी ‘गुगल मॅप’चा नवा उपाय

     सार्वजनिक वाहतुकीच्या सेवांचं वेळापत्रक सतत कोलमडलेलं असतं ही एक सर्वसामान्य नागरीकाची भावना असते. लोकांच्या याच समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न 'गुगल मॅप'ने केला आहे.

     सार्वजनिक वाहतुकीच्या सेवांचं वेळापत्रक सतत कोलमडलेलं असतं ही एक सर्वसामान्य नागरीकाची भावना असते. लोकांच्या याच समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न ‘गुगल मॅप’ने केला आहे. गुगलने आपल्या ‘गुगल मॅप’ या अँपमध्ये तीन नवे नेव्हिगेशन फीचर्स आणले आहेत. प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्यांसाठी हे तिनही फीचर्स उपयोगी ठरतील. यामुळे युजर्सना बसमध्ये प्रवासासाठी किती वेळ लागेल, ट्रेनची सद्यस्थिती काय आहे, आणि रिक्षा याबाबत निगडीत सर्व माहिती मिळेल. मुंबई, पुणे, बंगळुरु, दिल्ली, हैदराबाद, लखनौ ,चेन्नई, कोइंबतूर, म्हैसूर आणि सूरत या 10 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. 

जाणून घेऊ या तिन्ही फीचर्सबाबत 

रिअल-टाइम बस – आता गुगल मॅपवर तुम्हाला बसच्या प्रवासाची सगळी माहिती मिळेल. एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार याबाबतही कळेल. इतकंच नाही तर कुठे जास्त वाहतूक कोंडी आहे हे देखील समजू शकेल. गुगल लाइव्ह ट्रॅफिक डेटा आणि सार्वजनिक बस वाहतुकीचं वेळापत्रक यांच्या आधारे सर्व माहिती युजर्सना पोहोचवली जाईल.

ट्रेनचं लाइव्ह स्टेटस – आता रेल्वेचं लाइव्ह स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला रेल्वेचं संकेतस्थळ किंवा अन्य अॅपचा वापर जाण्याची गरज नाही. कारण आता गुगल मॅपवरच तुमच्या ट्रेनबाबतची सर्व माहिती मिळणार आहे. सध्या केवळ लांबपल्ल्यांच्या गाड्यांसाठीच हे फीचर कार्यान्वित आहे. Where is my Train या अॅपच्या मदतीने कंपनीने हे नवं फीचर सुरू केलं आहे.

रिक्षासाठी नवं फीचर – बस किंवा ट्रेनच्या प्रवासानंतर पुढील प्रवासाासठी रिक्षाचा वापर करणाऱ्यांना केंद्रीत करुन हे फीचर सुरू करण्यात आलं आहे. बस किंवा ट्रेन सोडल्यानंतर कोणत्या ठिकाणाहून रिक्षाचा प्रवास परवणारा असेल किंवा रिक्षाच्या प्रवासासाठी किती भाडं आकारलं जाणार अशाप्रकारची सर्व माहिती मिळेल. हे फीचर केवळ दिल्ली आणि बंगळुरुच्या युजर्ससाठी उपलब्ध असून लवकरच अन्य शहरांमध्येही ही सेवा सुरू करण्याचा गुगलचा प्रयत्न आहे.

दैनिक लोकसत्ता


Find Out More:

Related Articles: