कोरोना व्हायरस कधीच न संपण्याची शक्यता - जागतिक आरोग्य संघटना

Thote Shubham
सगळ्या जगाला कोरोनाने विळखा घेतला आहे. हा विळखा कधी सैल होणार, हा विषाणू कधी जाणार, असे प्रश्न सगळ्यांनाच पडत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणू कदाचित कधीच संपणार नाही किंवा जाणार नाही, अशी भिती व्यक्त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने व्हीडिओ कॉन्फरन्सच्या रूपात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांच्यासह इतर तज्ज्ञ उपस्थित होते.

कोरोना विषाणूवर लस विकसित झाली तरी देखील विषाणूला आळा घालण्यालाठी मोठे प्रयत्न करावे लागतील. तसंच कोरोनासोबत जगण्याचं कौशल्य आणि कसब आपल्या सगळ्यांना शिकावं लागणार असल्याचं डॉ. माईक रेयान म्हणाले.


साथीचे आजार पसरवणाऱ्या इतर अनेक विषाणूंप्रमाणे हा देखील एक विषाणू असेल. आणि तो आपल्या समाजातून कधीही संपणार नाही. एचआयव्ही विषाणूला देखील आपल्याला हद्दपार करता आलं नाही. कोरोनाला कसं हाताळायचं हे आता आपण शिकलं पाहिजे, असं डॉ. रेयान म्हणाले.

Find Out More:

Related Articles: