ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण
ब्रिटन – कोरोनाची लागण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यामुळे आपण स्वत:ला विलगीकरणात ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याआधी कोरोनाची ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनी लागण झाल्याने खळबळ उडाली होती. कोरोनाचा शिरकाव शाही राजघराण्यातही झाल्यानंतर आता पंतप्रधानांनाही कोरोनाची लागण झाल्याने गांभीर्य वाढले आहे.
ट्विट करत बोरिस जॉन्सन यांनी स्वत: आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, मला गेल्या २४ तासांपासून काही हलकी लक्षणे जाणवत होती. तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. सध्या मी विलगीकरणात आहे.
आपण सध्या कोरोना व्हायरसशी लढा देत असून मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सरकारचे नेतृत्व करत राहणार आहे. आतापर्यंत जगभरात २१ हजार जणांचा कोरोनाने जीव घेतला असून कोरोनाची लागण झालेल्या अनेक मोठ्या नेत्यांमध्ये आता बोरिस जॉन्सन यांचा देखील समावेश झाला आहे.