BS6 इंजिनसोबत लाँच झाली यामाहाची ही शानदार बाईक

Thote Shubham

यामाहा मोटार इंडियाने आपली लोकप्रिय बाईक YZF-R15 चे बीएस6 व्हर्जन लाँच केले आहे. या नवीन व्हर्जनची एक्स शोरूम किंमत 1.45 लाख रुपये आहे. सध्या बाजारात असलेल्या बीएस4 व्हेरिएंटच्या तुलनेत या व्हर्जनच्या किंमतीत 2 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. भारतातील सर्व डिलरकडे ही बाईक उपलब्ध आहे.

 

याआधी देखील कंपनीने यामाहा एफझेड आणि एफझेडएस या बाईक बीएस6 एमिशन नॉर्म्समध्ये अपडेट केल्या आहेत. या नवीन बीएस 6 व्हर्जनमध्ये साइड स्टँड कट-ऑफ स्विच, ड्युअल हॉर्न आणि मागे रेडियल ट्यूबलेस टायर देण्यात आला आहे.

 

या अपग्रेडेट व्हर्जनमध्ये 155cc, सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड बीएस6 इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 10000 आरपीएमवर 18.3 बीएचपी पॉवर आणि 8500 आरपीएमवर 14.1 एनएम टॉर्क देते. यामध्ये 6-स्पीड ट्रांसमिशन देण्यात आलेले आहे. ब्रेकिंग परफॉर्मेंससाठी यात ड्युअल डिस्क ब्रेक्ससोबत ड्युअल चॅनेल एबीएस मिळेल. हे नवीन व्हर्जन रेसिंग ब्ल्यू, थंडर ग्रे आणि डार्कनाइट या रंगात उपलब्ध आहे.

 

Find Out More:

Related Articles: