‘हे’ पदार्थ वाढवतील तुमची रोगप्रतिकारशक्ती

Thote Shubham Laxman

आजार होऊ नये यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणं गरजेचं असतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात थोडेसे बदल करणं आवश्यक आहे. जाणून घ्या रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश कराल.

आजारांचा सामना करण्यासाठी शरीराला सक्षम प्रणालीची आवश्यकता असते. ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. काही व्यक्तींमध्ये जन्मतःच रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा व्यक्तींना आजारांची लागण पटकन होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात थोडेसे बदल करणं आवश्यक असतं. यासाठी खाली दिलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

ब्रोकोली

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टरही ब्रोकोलीचं सेवन करण्यास सांगतात. ब्रोकोलीच्या सेवनाने अनेक पोषक घटक मिळतात ज्यामुळे शरीराचं अनेक आजारांपासून संरक्षण होतं. यामध्ये मुख्यतः व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी हे दोन महत्त्वाचे घटक असतात. शिवाय ब्रोकोलीमध्ये अँटीऑक्सिडंटचही प्रमाण असतं.

लसूण

प्रत्येकाच्या घरातील किचनमध्ये उपलब्ध असणारी लसूण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास खूप फायदेशीर ठरते. कच्च्या लसूणमुळे त्वचेच्या इन्फेक्शन पासून संरक्षण होतं. मात्र आहारात लसणीच्या पावडरचा समावेश करण्यापेक्षा अख्खा लसूण खाणं फायद्याचं आहे. यामुळे कोलेस्ट्रॉलचीही पातळी कमी होते.

मशरूम

मशरूमच्या सेवनाने शरीराला रिबोफॅव्हिन आणि नियासिन हे व्हिटॅमिन बी मधील घटक मिळतात. व्हिटॅमीन बीमुळे अनेक आजारांपासून दूर राहता येतं. ज्या व्यक्तीला ताप आलेला असतो त्यांना मशुरूमचं सेवन करण्यास सांगतात. व्हिटॅमिन बी मध्ये असणारे रिबोफॅव्हिन आणि नियासिन हे रासायनिक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

कलिंगड

कलिंगडाच्या सेवनाने केवळ शरीर थंड राहण्यास मदत होत नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी शरीराला अँटिऑक्सिडंटची आवश्यकता असते. कलिंगडामध्ये ग्लुटॅथिओन हा अँटिऑक्सिडंटमधील घटक असतो. या घटकामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

गहू

गव्हामध्ये भरपूर प्रमाणात झिंक, अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमीन डी असतं. हे सर्व घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास महत्त्वाचे असतात. यासाठी गव्हापासून तयार होणारे पदार्थ खावेत.

पालक

भरपूर प्रमाणात पोषक घटक पालक या पालेभाजीत असतात. पालकमध्ये असणाऱ्या फॉलेक या घटकामुळे शरीरात नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. शिवाय पालकमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट, आणि व्हिटॅमिन सी सारखे महत्त्वाचे घटक असतात. हे घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढणवण्यासाठी गरजेचे असतात.

रताळं 

रताळं, गाजर यांमध्ये बीटा कॅरोटीन असतं. या पदार्थांच्या सेवनाने बीटा कॅरोटीन शरीरात जाऊन त्याचं व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर होतं. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.


Find Out More:

Related Articles: