व्यायाम करण्याआधी या पाच गोष्टी नक्की खाव्यात

Thote Shubham Laxman

दर वर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरच्या दरम्यान नँशनल न्युट्रिशन वीक साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश लोकांना चांगल्या आरोग्यासाठी योग्य खाण्या-पिण्याच्या गोष्टीबद्दल त्यांना जागृक करणे हा आहे. व्यायामाच्या आधी देखील योग्य आहार घेणे गरजेचे आहे. खासकरून व्यायामाच्या आधी पौषकतत्व असणारा आहार घ्यावा जेणेकरून तुम्हाला व्यायाम करताना ताकद मिळेल व ते तुमच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. आम्ही आज तुम्हाला अशाच काही पोषक वस्तूंबद्दल सांगणार आहोत जे व्यायामाच्या आधी खाने फायदेशीर ठरते.

केळे – केळ्यांमध्ये पोटेशियम मोठ्या प्रमाणात असते. जे तुमच्या मांसपेशींच्या क्रियेसाठी गरजेचे असते. केळे तुमच्या शरीराला व्यायामासाठी आवश्यक असलेले कार्बोहायड्रेट बी देते.

आंबा – आंबा शरीरातील एनर्जी लेवल वाढवते. त्याचबरोबर विटामिन मिनरल आणि एंटीऑक्सीडेंट देखील देते.

ओटमील आणि ब्लूबेरिज – या दोन्ही गोष्टींमुळे तुमच्या शरीराला आवश्यक असणारे प्रोटिन मिळते. यामुळे व्यायाम करत असताना तुमच्या मांसपेशींना सपोर्ट मिळतो.

कमी फँट असणारे चीज – यामध्ये दुधाचे व ताकाचे प्रोटीनचा समावेश असतो. दुधापासून मिळणारे प्रोटिन पचण्यासाठी खूप वेळ लागतो, मात्र त्याचबरोबर शरीराला अधिकवेळेसाठी उर्जो देखील प्रदान करते. त्याचबरोबर एप्रीकॉट हे विटामिनचा चांगला स्रोत असून ते ह्रदयासाठी आणि हाडांसाठी फायदेशीर आहे.

अंडी आणि अवोकॅडो – जर तुम्हाला भूक लागत असेल तर तुम्ही प्रोटिनचा स्रोत म्हणून अंडी खाऊ शकता. यामुळे तुमचे पोट देखील भरलेले राहिल व व्यायामाच्या वेळी मोठ्याप्रमाणात उर्जा देखील असेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही


Find Out More:

Related Articles: