विद्यार्थ्यांसाठी इस्रो मार्फत ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धा
पुणे : अवकाश कार्यक्रमांबद्दल जाणीवजागृती वाढविण्याच्या दृष्टीने इस्रो मार्फत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात येत आहे. येत्या 25 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे.
या स्पर्धेत उत्तम गुण मिळविणाऱ्या प्रत्येक राज्यातील गुणानुक्रमे इयत्ता आठवी ते दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत इस्रो, बेंगळूर येथे चांद्रयान-2 च्या लॅंडिंगचे थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी उपलब्ध होणारआहे.
ऑनलाइन प्रश्नमंजूषा https://quiz.mygov.in/quiz/online-space-quiz/ येथे उपलब्ध आहे. ऑनलाईन प्रश्नमंजूषेमध्ये 10 मिनिटांच्या कालावधीत 20 प्रश्न सोडवायचे आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी पालकांना मदत करण्याची मुभा देण्यात आली आहे.
सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना mygov.in या पोर्टल वर नावनोंदणी करण्यासाठी “एसएमएस’ सेवेद्वारे आपले लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करून घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आपल्या मोबाइलवरून (7738299899) या क्रमांकावर आपण चधजत युजरनेम असा “एसएमएस’ पाठवून आपला लॉगिन तपशील सेवेद्वारे प्राप्त होईल.