
राज्यात आज दिवसभरात 1089 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 37 जणांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या राज्यात कोरोनाचे 19 हजार रुग्ण आहेत. त्यापैकी एकट्या मुंबईतील 12 हजार रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतल्या धारावी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानं मुंबईची चिंता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धारावीत आतापर्यंत कोरोनाचे जवळपास 800 रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत सुद्धा वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत राज्यात 3 हजार 470 रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहे.