‘रिषभ पंतवर जी टीका होतेय त्यावर माझा विश्वासचं बसत नाही’ - अजित आगरकर

Thote Shubham
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रिषभ पंत याला इशारा दिला आहे. इथून पुढच्या सामन्यात चुका झाल्या तर संघातून बाहेर काढण्यात येणार असल्यच सांगितल आहे. गेले काही दिवस मैदानावर रिषभ पंत कडून वारंवार चुका होत आहेत.
त्यामुळे संघ अडचणीत येत आहे. तसेच संघ अडचणीत असतानाही पंत गांभीर्याने खेळत नसल्याच निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशिक्षक शास्त्री यांनी पंतला कौशल्य दाखव अन्यथा घरचा रस्ता पकड, असा इशारा दिला आहे.

प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अनेक माजी खेळाडूंनी रिषभ पंतवर टीका केली आहे. तसेच अनेकांनी त्यांच्या शॉट सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रिषभ हा मागील काही सामन्यांमध्ये बेजबाबदार फटके मारून बाद झाला आहे. त्यामुळेच त्याच्यावर निशाष्ण साधला जात आहे. तसेच त्याच्या पर्यायांचाही विचार केला जात आहे अशी चर्चाही सध्या सुरु आहे.

दरम्यान रिषभ पंतवर होत असलेल्या टीकेवर माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ‘ऋषभवर सध्या जी काही टीका होतेय ते पाहून मला खरतर विश्वासच बसत नाहीये. त्याने भारताबाहेर कसोटीमध्ये दोन शतकं झळकावली आहेत. तो आजही उपयुक्त खेळी करु शकतो. टी-२० क्रिकेटमध्ये काहीवेळा तुम्हाला आक्रमक व्हावं लागतं, हवेतून फटके खेळावे लागतात अस विधान केले.

तसेच ऋषभकडून भारतीय संघाला नेमक्या काय अपेक्षा आहेत हे आधी ठरवावं लागणार आहे. ऋषभ तुम्हाला चौथ्या क्रमांकावर येऊन संघाचा डाव सावरणारा खेळाडू म्हणून हवाय की तो एक आक्रमक खेळाडू म्हणून हवाय हे नक्की करावं लागेल.

काही सामन्यांसाठी श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर संधी देऊन श्रेयसला मधल्या फळीत खेळवता येऊ शकतं. सध्याच्या घडीला ऋषभवर अवास्तव दबाव आणि टीका केली जात आहे असं आगरकर यांनी म्हटले आहे.


Find Out More:

Related Articles: